June 18, 2024 11:49 AM June 18, 2024 11:49 AM
27
राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागातल्या रिक्त पदांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया
राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागात रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे साडे सातशे, परभणीत १४१ तर जालना पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या १०२ आणि चालक पदाच्या २३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होईल. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, असं आवाहन जालन्याचं पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केलं आहे.