November 15, 2024 11:06 AM

views 31

पुण्यात पाचवी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू

पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात पाचवी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू आहेत. काल दुसऱ्या दिवसाखेर १० मीटर एअर पिस्टल एच एस १ महिला गटाच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या भक्ती शर्मा हिने सुवर्ण पदक पटकावले; तर राजस्थानच्या श्रृष्ठी असोरानं रौप्य पदक पटकावला. पॅरिस पॅरालिंपिकमध्ये कास्य पदक मिळवणारी मध्य प्रदेशची रूबिना फ्रान्सिस सातव्या क्रमांकावर फेकली गेली. १० मीटर एअर रायफल प्रोन मिक्स एच एस १ गटात राजस्थानच्या मोना अग्रवाल हिने सुवर्ण कामगिरी केली; तर महाराष्ट्राच्या स्वरू...