July 4, 2024 10:13 AM July 4, 2024 10:13 AM
21
आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर
आसाम राज्यातली पूरस्थिती गंभीर असून 29 जिल्ह्यांमधील 16 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. काल आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 46 वर पोहोचली आहे, तर आणखी 3 जण बेपत्ता आहेत. राज्यभरातील 105 महसूल मंडळातील एकूण 2800 गावं पुरामुळे बाधित झाली असून 39 हजार 400 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. पुरामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील 178 वन तपासणी नाकी आणि प्राण्यांनी जवळच्या टेकड्यांवर स्थलांतर केलं आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी उद्...