July 9, 2024 6:35 PM July 9, 2024 6:35 PM
13
९४ हजार ८८९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर
राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर अवघ्या काही मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकंदर ९४ हजार ८८९ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. यामध्ये, याच अतिरिक्त अर्थसंकल्पात मांडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. सर्वाधिक, २६ हजार २७३ कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या मागण्या महिला आणि बालहक्क विकास विभागाच्या, तर त्याखालोखाल, १४ हजार ५९५ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या मागण्या नगर विकास विभागाच्या आहेत. विधानसभा निवडणुकीत...