August 27, 2024 8:42 AM August 27, 2024 8:42 AM
16
मालवण-राजकोट इथला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. पुतळा कोसळल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले असून त्यांनी शांतता आणि संयम बाळगावा, असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुतळ्याच्या परिसरात पोलीस तैनात केले आहेत. या प्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार, कन्सल्टंट आणि ठेकेदार यांच्याव...