July 24, 2024 7:54 PM July 24, 2024 7:54 PM

views 6

भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार

भाजपाच्या पुण्यात झालेल्या प्रदेश अधिवेशनानंतर आता भाजपाच्या संघटनात्मक ७८ जिल्ह्यांमध्ये २, ३ आणि ४ ऑगस्ट दरम्यान जिल्हा अधिवेशनं आणि विस्तारित कार्यकारिणी बैठका होणार आहेत.   पक्षाच्या मंडल रचनेतल्या सर्व म्हणजे ७७८ मंडलांमध्ये ९, १० आणि ११ ऑगस्ट दरम्यान अधिवेशनं आणि बैठका होतील. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.