February 11, 2025 10:55 AM

views 27

प्रयागराजसाठी पुणे विभागातून 21 फेब्रुवारीला सोडण्यात येणार विशेष रेल्वेगाडी

महाकुंभ मेळ्यानिमित्त जानेवारी महिन्यात, पुणे विभागातून 80 हजार 177 प्रवाशांनी रेल्वेने प्रयागराजपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला 8 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे विभागातून आत्तापर्यंत 5 विशेष रेलगाड्या प्रयागराजसाठी सोडण्यात आल्या असून 21 फेब्रुवारीलाही विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. आयआरटीसीमार्फत प्रयागराज इथं यात्रेकर...

February 7, 2025 3:25 PM

views 28

कोळशाच्या भट्टीवर डांबून ठेवलेल्या २६ वेठबिगार कामगारांची सुटका

कोळशाच्या भट्टीवर डांबून ठेवलेल्या २६ वेठबिगार कामगारांची सुटका पुणे पोलिसांनी केली. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातल्या गिरवी गावात या कामगारांना सहकुटुंब डांबून ठेवून त्यांच्याकडून सक्तीने काम करुन घेतलं जात होतं. याची खबर मिळाल्यावर श्रमजीवी संघटनेनं पोलिसांकडे धाव घेतली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी २६ पुरुष कामगार आणि त्यांची कुटुंबं मिळून एकूण ४८ जणांची सुटका केली, तसंच त्यांना डांबून ठेवणारा सयाजी बांदलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

February 7, 2025 9:32 AM

views 37

पुणे हे देशाचं संरक्षण उत्पादनाचं केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाचं डिफेन्स क्लस्टर अर्थात संरक्षण उत्पादनाचं केंद्र महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यापूर्वी संपूर्ण संरक्षण उत्पादनांचे आयात करणारा आपला देश आज 25 हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहे. संरक्षण क्षेत्रात जगातील प्रगत देशांमध्ये आपला समावेश होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मेक ...

February 3, 2025 9:03 AM

views 26

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

अहिल्यानगर इथं झालेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत, पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ यानं मानाची चांदीची गदा पटकावली. गादी गटात पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. त्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजेता ठरला. माती गटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड आणि परभणीच्या साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली; त्यामध्ये सोलापूरचा महेंद्र गायकवाड जिंकला. त्यानंतर अंतिम लढत मोहोळ आणि गायकवाड यांच्यात झाली. यामध्ये मोहोळ याने बाजी मारली. केंद्रीय राज्...

January 16, 2025 8:42 AM

views 21

७७ वा लष्कर दिन सर्वत्र साजरा-संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ७७ वा लष्कर दिन काल साजरा झाला. १९४९ मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन पुण्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी झालेल्या गौरवगाथा या कार्यक्रमात बोलतांना, लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या सैनिकांचा गौरव असल्याचं प्रतिपादन ...

January 13, 2025 10:29 AM

views 26

विश्व मराठी संमेलनात यंदा श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर होणार चर्चा

पुण्यात होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात यंदा प्रथमच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर चर्चा होणार असल्याची घोषणा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मराठी संस्कृती जगभरात नेण्यासाठी विश्व मराठी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र या संमेलनाचा पॅटर्न बदलला असून, मराठी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी या ग्रंथांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.

January 7, 2025 10:29 AM

views 32

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने पुण्यात उद्यापासून तृणधान्य महोत्सवाचं आयोजन

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीनं पुण्यात तृणधान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 8 ते 12 जानेवारी या कालावधीत महोत्सव होणार असून यासाठी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली. 'उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्पनेअंतर्गत महोत्सवातल्या पन्नास दालनांमध्ये अस्सल तृणधान्यं आणि त्यापासून निर्मित नाविन्यपूर्ण असंख्य उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध असतील.तृणधान्य उत्पादन, तृणधान्यांच्या महत्त्वाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्श...

November 15, 2024 11:06 AM

views 31

पुण्यात पाचवी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू

पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात पाचवी राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा सुरू आहेत. काल दुसऱ्या दिवसाखेर १० मीटर एअर पिस्टल एच एस १ महिला गटाच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या भक्ती शर्मा हिने सुवर्ण पदक पटकावले; तर राजस्थानच्या श्रृष्ठी असोरानं रौप्य पदक पटकावला. पॅरिस पॅरालिंपिकमध्ये कास्य पदक मिळवणारी मध्य प्रदेशची रूबिना फ्रान्सिस सातव्या क्रमांकावर फेकली गेली. १० मीटर एअर रायफल प्रोन मिक्स एच एस १ गटात राजस्थानच्या मोना अग्रवाल हिने सुवर्ण कामगिरी केली; तर महाराष्ट्राच्या स्वरू...

November 9, 2024 10:46 AM

views 23

पुण्यात येत्या 12 तारखेपासून राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धांचं आयोजन

तीक्ष्ण नजर आणि एकाग्रता ही नेमबाजी या खेळाची बलस्थानं... पण नजरच नसेल तर ? पण तरीही हा खेळ खेळता येऊ शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकही मिळवता येऊ शकतं हे दिव्यांग नेमबाजांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अशीच चमकदार कामगिरी करणाऱ्या दिव्यांगाच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पुण्यात रंगणार आहेत. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात 12 ते 16 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धा होत आहेत. टोकियो आणि पॅरिस पॅरालिंपिक सुवर्ण पदक विजेत्या खेलरत्न पुरस्कार विजेत्...

October 2, 2024 7:30 PM

views 21

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू

पुण्यात बावधन इथं आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालं होतं. बावधन परिसरातून आज सकाळी पावणे सात वाजता हेलिकॉप्टरने धुके असताना देखील उड्डाण केलं, त्यानंतर हा अपघात झाला. घटनास्थळी पुणे महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसंच अग्निशमन दलाकडून बचावकार्य करण्यात आलं.