June 20, 2025 10:24 AM June 20, 2025 10:24 AM

views 8

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आज पुण्यात आगमन

टाळ मृदुंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं आषाढी वारीसाठी काल आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. रात्री आठनंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरा मंदिर आणि शहर प्रदक्षिणा झाल्यावर पालखी सोहळा आजोळघरी विसावला. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाला. त्यानंतर आकुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हा पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला. ...

June 18, 2025 9:13 AM June 18, 2025 9:13 AM

views 13

पैठणहून संत एकनाथ महाराज पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान

पैठण इथं संत एकनाथ महाराजांची पालखी आज सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. दरम्यान, नव्याने घडवण्यात आलेल्या नाथांच्या चांदीच्या पालखी रथाचं काल खासदार संदिपान भुमरे यांच्या पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. अनेक भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

November 6, 2024 9:08 AM November 6, 2024 9:08 AM

views 19

श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत

धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं काल धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. ही पालखी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही पालखी तेरहून निघून कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पोहोचते.