July 23, 2024 8:24 PM July 23, 2024 8:24 PM
12
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजार गावं बारमाही रस्त्यांनी जोडली जाणार
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार मदत देणार असून यावर्षी भांडवली खर्चासाठी ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. ही गुंतवणुक देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३ पूर्णांक ४ दशांश टक्के असेल. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात २५ हजार गावं बारमाही रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. पूर नियंत्रणासह बिहार आणि आंध्र प्रदेशासाठी विविध सवलतींची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. ग्रामीण आणि शहर...