June 22, 2024 7:28 PM June 22, 2024 7:28 PM

views 24

पाणीपट्टी दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडून स्पष्ट

राज्य सरकारनं पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याची बातमी काँग्रेस पसरवत आहे, मात्र ही संपूर्ण दरवाढ महाविकास आघाडीच्या काळात झाली होती, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं आहे. २९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातच ही दरवाढ झाली. मात्र शेतकऱ्यांना भूर्दंड पडू नये, यासाठी ही दरवाढ स्थगित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, येत्या आठवड्यातच ते पूर्ण होईल, असं फडनवीस यांनी स्पष्ट केलं.