August 31, 2024 1:04 PM August 31, 2024 1:04 PM
11
पंजाबमध्ये पाणीटंचाई चिंताजनक, अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट
पंजाबमध्ये पाणीटंचाई चिंताजनक असून अनेक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. एकूण 23 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून अन्य 9 जिल्ह्यांमध्येही पाणी पातळीची अवस्था बिकट आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार राज्यभरात केवळ 17 अब्ज क्युबिक मिटर भूजल उपलब्ध आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भूजल पातळीत 44 मिटरहून जास्त घट झाली असून इतर अनेक जिल्ह्यातही पाण्याची पातळी खालावली आहे.