February 7, 2025 1:39 PM February 7, 2025 1:39 PM

views 14

पाकिस्तानातल्या ६८ हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नाान

कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या ६८ हिंदू भाविकांचा जत्था काल प्रयागराज इथं पोहोचला आणि त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर या भाविकांनी आपल्या पुर्वजांसाठी धार्मिक विधी आणि प्रार्थना केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना यात्रेकरूंनी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आपल्याला त्वरित व्हिसा जारी केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. यात्रा स्थळी त्यांनी विविध शिबिरांना भेट दिली आणि कुंभमेळ्याच्या एकूण आयोजनाची प्रशंसा केली.

November 9, 2024 2:14 PM November 9, 2024 2:14 PM

views 16

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यू

पाकिस्तानात बलुचिस्तानमधे क्वेट्टा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात २४ जणांचा मृत्यु झाला तर ४०हून अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस, बचाव पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून मदतकार्य सुरु आहे. जाफर एक्स्प्रेस स्थानकातून निघत असताना हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात असून अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या काही दिवसात पाकिस्तानच्या या भागात वारंवा...

June 18, 2024 3:17 PM June 18, 2024 3:17 PM

views 12

पाकिस्तानचा शास्त्रज्ञ निशांत अग्रवालच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांची घुसखोरी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शास्त्रज्ञ निशांत अग्रवाल याच्या वैयक्तिक संगणकात आयएसआयच्या हेरांनी ३ ॲपद्वारे घुसखोरी करून माहिती चोरी केल्याचं तपासात उघडकीला आलं आहे, असं उत्तर प्रदेशाचे दहशहतवाद विरोधी पथकाचे अधिकारी पंकज अवस्थी यांनी या खटल्यादरम्यान दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या निशांतच्या वैयक्तिक संगणकांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर एटीएस आणि गुप्तचर संस्थांनी केंद्रीय ...