August 24, 2024 10:24 AM August 24, 2024 10:24 AM

views 12

अंतरिक्ष क्षेत्राव्यतिरिक्त देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासातही इस्रोचं लक्षणीय योगदान -पहिल्या अंतरिक्ष दिनानिमित्त राष्ट्रपतींचं प्रतिपादन.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं केवळ अंतरिक्ष क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या सामाजिक आर्थिक विकासातही महत्त्वाचे योगदान दिल्याचं प्रतिपादन काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. पहिल्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिनाच्या कार्यक्रमात त्या काल दिल्ली इथं संबोधित करत होत्या. अंतरिक्ष क्षेत्रातल्या प्रगतीमुळे आरोग्य, वाहातूक, पर्यावरण, उर्जासुरक्षा, माहिती तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांना लाभभ झाला आहे असे सांगून राष्ट्रपती म्हणाल्या की, अंतराळ संशोधनामुळे मानवी क्षमतांमध्ये वाढ झाली आहे. कल्...