January 16, 2025 2:11 PM January 16, 2025 2:11 PM

views 13

संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

पश्चिम बंगालमध्ये काल एका संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संशयितासह इतर दोघांना राजगंज इथल्या सुधारगृहात नेत असताना त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

October 10, 2024 3:26 PM October 10, 2024 3:26 PM

views 15

पश्चिम बंगालमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेचा आरोप

पश्चिम बंगालमधल्या कोलकता डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, कोणतंही लेखी आश्वासन द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकार आणि ज्यूनियर डॉक्टर यांच्यात काल बैठक झाली, मात्र यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन सुरू राहील असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

August 27, 2024 8:17 PM August 27, 2024 8:17 PM

views 17

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानत आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये  काही ठिकाणी उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, येत्या ३० तारखेपर्यंत गुजरात, आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यानं मच्छिमारांना समुद्राच्या न जाण्यचा सल्ला हवामान वि...

August 27, 2024 8:09 PM August 27, 2024 8:09 PM

views 11

विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपातर्फे उद्या पश्चिम बंगाल बंद

कोलकाता शहराच्या काही भागांमध्ये आज आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात संघर्ष झाला. पोलिसांनी लावलेले अडथळे तोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी, तसंच जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचे फवारे आणि लाठीमार केला. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पोलिसांन...

June 18, 2024 9:11 AM June 18, 2024 9:11 AM

views 21

दार्जिलिंगमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सायंकाळी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडे जाणाऱ्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सकाळी झालेल्या या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.राष्ट्रपती द...

June 17, 2024 6:22 PM June 17, 2024 6:22 PM

views 23

पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीमध्ये रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या न्यु जलपायगुडी स्थानकाजवळ सियालदाहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ठिकाणीचे बचाव कार्य पूर्ण झालं आहे. प्रथमदर्शनी मालगाडी चालकानं सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यानं हा अपघात झाल्याचं  निदर्शनास आलं असून अधिक तपासनंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल, असं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा-सिन्हा यांनी सांगितलं.      &nbs...