February 5, 2025 4:18 PM February 5, 2025 4:18 PM

views 5

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून त्यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलं मनही भक्तिमय झालं होतं, अशा भावना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या. जीवनदायिनी गंगा देशवासियांना शांती, सद्बुद्धी,...

February 4, 2025 2:26 PM February 4, 2025 2:26 PM

views 7

भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्यल वांगचुक यांनी त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्यल वांगचुक यांनी आज प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. भूतान नरेश आज अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरात दर्शन घेणार असून ते डिजिटल महाकुंभ एक्सपिरिअन्स सेंटरलाही भेट देतील उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आज संगमावर स्नान केलं.