June 18, 2024 11:17 AM June 18, 2024 11:17 AM

views 25

पर्यावरण संवर्धन कायद्याला युरोपीयन संघातील पर्यावरण मंत्र्यांच्या गटाची मंजूरी

नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहावा या हेतूने करण्यात आलेल्या बहुचर्चित पर्यावरण संवर्धन कायद्याला युरोपीयन संघातील पर्यावरण मंत्र्यांच्या गटाने मंजूरी दिली.जंगलांचं संवर्धन,ओसाड जमीन ओलिताखाली आणणं आणि नद्यांना मुक्तवाहिनी करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. युरोपियन संघातील ६६ टक्के लोकसंख्येचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या २० सदस्यांनी या कायद्याच्या बाजूने मतदान केलं.२०३० पर्यंत युरोपियन संघातील जमिनी आणि सागरी क्षेत्रांपैकी किमान २० टक्के क्षेत्र पुनःस्थापित करणं आ...