December 12, 2024 10:35 AM December 12, 2024 10:35 AM

views 5

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत होणार सहभागी

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाह्यान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी संयुक्त अरब आमिरातीच्या नेत्यांचं समाजमाध्यमांवरून स्वागत केलं आहे. या भेटीमुळे उभय देशांमधली भागिदारी आणखी बळकट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. भारत आणि संयुक्त अरब आ...

October 27, 2024 7:17 PM October 27, 2024 7:17 PM

views 14

उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं प्रतिपादन

जागतिक उद्योगक्षेत्राबरोबरच, जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. जागतिक उद्योगविश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.   राज्य आणि केंद्र सरकार जिथे एकत्र काम करतात ती  उद्योगांची सहाजिकच पहिली पसंती असते असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज केलं. मुंबईत भाजपा कार्य...

October 4, 2024 12:38 PM October 4, 2024 12:38 PM

views 17

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचा आज श्रीलंका दौरा

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आज श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते श्रीलंकेच्या नेतृत्वाची भेट घेणार आहेत. भारताच्या शेजारधर्म प्रथम या धोरणानुसार तसंच सागर दृष्टिकोनाला अनुसरून दोन्ही देशांचे पूर्वीपासूनचे संबंध अधिक बळकट करण्याच्या सामायिक बांधिलकीवर या दौऱ्यात प्रकर्षानं भर दिला जाईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

August 10, 2024 11:33 AM August 10, 2024 11:33 AM

views 14

डॉ एस जयशंकर यांनी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मूसा जमीर यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित केले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, मूसा जमीर यांनी काल मालेमध्ये समुदाय विकास प्रकल्पांचं उद्घाटन करत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. माले इथे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांच्याशी झालेली चर्चा फलदायी झाल्याचं जयशंकर यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या चर्चेत विकास भागीदारी, क्षमता निर्माण, द्विपक्षीय आणि प्रादेशिक सुरक्षा, व्यापार आणि डिजिटल सहकार्य या विषयांचा समावेश होता. यावेळी रस्त्यावरील दिवे, मानसिक आरोग्य, मुलांची वाचा सुधार उ...

July 29, 2024 4:10 PM July 29, 2024 4:10 PM

views 22

टोकियो इथं आयोजित ‘क्वाड’ परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

जपानच्या टोकियो इथं आयोजित ‘क्वाड’ परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक सुरू आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासह जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. जागतिक पातळीवर आर्थिक वाढ करणं हे एक मोठं आव्हान असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर बदललेले आचार आणि विचार यांचा मेळ साधून ही प्रगती करता येऊ शकते. मानवनिर्मित किंवा नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी सामूहिक पातळीवर प्रयत्नांची आवश्यकता आहे, असं डॉ. जयशंकर या बैठकीवेळी म्...