October 5, 2024 8:39 PM

views 23

आगामी शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारत पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन

आगामी शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारत पाकिस्तानसोबत असलेल्या संबंधांबाबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. सार्कमध्ये गेल्या काही वर्षात बैठकांचं आयोजन न झाल्याने कोणतीही प्रगती साध्य झाली नाही अशी टीका त्यांनी केली. भारतालाही पाकिस्तानबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायला आवडेल, मात्र यासाठी सीमेपलीकडच्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं.

July 21, 2024 10:30 AM

views 15

बांग्लादेशातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर, एक हजार भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परत

बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभुमीवर, तिथले अंदाजे एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 778 विद्यार्थी जलमार्गानं तर दोनशे विद्यार्थी ढाका आणि चितगाँग विमानतळावरून सुटणाऱ्या नियमित विमानसेवेद्वारे मायदेशी परतले. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ढाकातील भारतीय उच्चायुक्तालय तसंच चितगाँग, राजशाही, सिलहेट आणि खुलना इथल्या सहायक उच्चायुक्तांनी भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यात सहाय्य केलं. या नागरिका...