June 13, 2025 3:47 PM June 13, 2025 3:47 PM

views 15

परभणी जिल्‍ह्यात पूर्णा इथं आज घेण्यात आलं योग शिबिर

परभणी जिल्‍ह्यात पूर्णा इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आज योग शिबिर घेण्यात आलं. शहरातील विद्या प्रसारणी शाळेच्या सभागृहात समर्थ प्रभात योग समिती आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं. यावेळी योग प्रशिक्षकांनी विविध आसनांची प्रात्यक्षिकं सादर केली त्यानंतर योग जनजागरण फेरी काढण्यात आली.

April 9, 2025 9:58 AM April 9, 2025 9:58 AM

views 22

परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी घेतला आढावा

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी काल परभणी इथं शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत आदर्श शाळा, निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली वृद्धी, सीएम श्री शाळाबाबत माहिती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना आदींचा आढावा घेण्यात आला.

February 6, 2025 10:38 AM February 6, 2025 10:38 AM

views 21

परभणी – नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

परभणी जिल्ह्यात नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस मुदतवाढ द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. आजपासून सरकारी खरेदी बंद होणार आहे मात्र नोंदणी केलेल्या 5 हजार 176 शेतकऱ्यांच्या सोयाबिनची खरेदी अजूनही झालेली नाही. मुदतीच्या काळात पोत्यांभावी 20 ते 25 दिवस सोयबीन खरेदी बंद होती. सर्व खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू ठेवावीत, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केली आहे.

December 8, 2024 11:08 AM December 8, 2024 11:08 AM

views 11

परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

परभणी येथे विभागस्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, वक्तृत्व, कौशल्य विकास, कविता वाचन, कथालेखन, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या नव संकल्पना इत्यादी विविध प्रकारात स्पर्धा झाल्या, विजेत्यांना प्रमाणपत्र तसंच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. हे विजेते कलाकार येत्या १२ डिसेंबरला नांदेड इथं होणाऱ्या राज्य युवा महोत्सवात सहभागी होत आहेत.

November 11, 2024 9:32 AM November 11, 2024 9:32 AM

views 15

दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू

परभणी शहराजवळ वसमत महामार्गावरव दुचाकीला ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नी आणि मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. एकनाथ घुगे हे पत्नी शुभांगी आणि मुलगा समर्थ यांच्यासह परभणी इथून हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या अंजनवाडी गावाकडे दुचाकीवर जात असताना विना नंबरच्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात उलट दिशेने येऊन त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला. मयत एकनाथ घुगे हे रिसोड बस डेपोत वाहक म्हणून कार्यरत होते.

November 6, 2024 10:20 AM November 6, 2024 10:20 AM

views 6

मतदान जनजागृतीसाठी परभणीत निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार असे स्टिकर्स

मतदान जनजागृती करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयाच्यावतीनं, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार, असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसंच कलापथकांच्या वाहनांवर आवाजाचे भोंगे लावून मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

July 14, 2024 6:27 PM July 14, 2024 6:27 PM

views 27

परभणी जिल्ह्यात ६ लाखाच्यावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी भरले अर्ज

परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टरसाठी अर्ज भरले आहेत. या योजनेअंतर्गत केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा कवच दिलं जातं. हे अर्ज भरण्यासाठी उद्यापर्यंत मुदत असल्यानं जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरले नाहीत त्यांनी अर्ज करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.