June 15, 2024 1:44 PM June 15, 2024 1:44 PM
31
देशाच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज ३० कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ
देशाच्या परकीय चलन साठ्यात ४ अब्ज ३० कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली असून ७ जूनला संपलेल्या आठवड्यात तो ६५५ अब्ज ८१ कोटी ७० लाख डॉलर्सवर पोहोचला आहे. आतापर्यंत भारताकडच्या परकीय चलनाचा हा सर्वात जास्त साठा आहे. यापूर्वी सर्वाधिक साठा ६५१ अब्ज ५१ कोटी डॉलर्स इतका गेल्या १० मे रोजी होता.