July 22, 2024 2:35 PM

views 18

पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर पद्म पुरस्कारांसाठी नामांकन आणि शिफारशी नोंदता येतील, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा समावेश आहे. पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते.