October 9, 2024 1:44 PM October 9, 2024 1:44 PM
9
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर
भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज जाहीर झाला. व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय बँकेनं सलग १०व्या आढाव्यात घेतला आहे. त्यामुळे रेपो दर साडेसहा टक्क्यांवर, स्टँडींग डिपॉझिट फॅसिलिटी दर सव्वा सहा टक्क्यांवर आणि मार्जिनल डिपॉझिट फॅसिलिटी दर पावणे सात टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक गेल्या सोमवारपासून मुंबईत झाली. त्या नंतर हा आढावा जाहीर करण्यात आला आहे. यावेळच्या चलनविषयक धोरणात चलनफुगवट्याबाबत दीर्घ काळासाठी जैसे थे भूमिका स्वीकारण्याचा निर्ण...