August 11, 2024 8:07 PM August 11, 2024 8:07 PM

views 11

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातल्या  राहाता आणि  शिर्डी या परिसरातला  शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या  अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती  पणन आणि अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.   सत्तार यांच्या हस्ते आज  राहाता बाजार समितीच्या परिसरात विविध विकासकामांचं  भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. आगामी काळात बाजार समिती परिसरात  शेतकरी भवन  बांधण्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर केले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं.