January 16, 2025 2:15 PM January 16, 2025 2:15 PM
4
पंजाब सरकार शहीद भगतसिंह यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री भगवंत मान
पंजाब सरकार शहीद भगतसिंह यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल केली. संग्रहालयापासून भगतसिंहांच्या वडिलोपार्जित घरापर्यंत ८५० मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे, असं मान यांनी सांगितलं. यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातलं राज्याचं योगदान अधोरेखित होईल आणि तरुणांना देशासासाठी काम करायला प्रेरणा मिळेल असं मान म्हणाले.