September 25, 2024 10:46 AM September 25, 2024 10:46 AM
15
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या अधिवेशनातील सर्वसाधारण चर्चेला न्यूयॉर्कमध्ये सुरूवात
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या अधिवेशनातील सर्वसाधारण चर्चेला काल न्यूयॉर्कमध्ये सुरूवात झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री, डॉ. एस. जयशंकर 28 सप्टेंबर रोजी भाषण करतील. कोणालाही मागं न टाकता सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी शांतता, शाश्वत विकास आणि मानवी प्रतिष्ठेच्या प्रगतीसाठी एकत्र काम करणं ही यंदाच्या चर्चेची मध्यवर्ती संकल्पना आहे.