August 16, 2025 11:29 AM August 16, 2025 11:29 AM

views 7

श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाच्या जहाजांची संयुक्त सरावाला सुरुवात

श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस राणा आणि आयएनएस ज्योती यांच्या संयुक्त सरावाला कालपासून श्रीलंकेत सुरुवात झाली आहे. येत्या २५ ऑगस्टपर्यंत हा सराव सुरु राहणार आहे. अशा प्रकारच्या सरावामुळे गेल्या दोन दशकांपासून दोन्ही राष्ट्रांमधील सागरी सहकार्य मजबूत होऊन परस्पर कार्यक्षमता, सागरी सहकार्य वाढवणे, संयुक्तपणे बहुआयामी सागरी ऑपरेशन्स करताना सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे शक्य झालं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.  

December 5, 2024 10:44 AM December 5, 2024 10:44 AM

views 14

सागरी व्यापार संरक्षित करून भारतीय नौदल देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील-राष्ट्रपतींचा विश्वास

भारतीय नौदल नेहेमीच देशाच्या सागरी सीमांचं रक्षण करत राहणार असून, 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्यासाठी आपलं सहकार्य आणि योगदान देत राहील असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. ओडिशातील पुरी येथील ब्लू फ्लॅग बीचवर नौदल दिनाच्या समारंभात त्या बोलत होत्या. सागरी व्यापार संरक्षित करून नौदल एकप्रकारे देशाची आर्थिक व्यवस्था संरक्षित करत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ट्रायडंटच्या वर्धापन दिनानिमित्त नौदल दि...

December 4, 2024 11:11 AM December 4, 2024 11:11 AM

views 15

21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला नौदलाची मंजुरी

नौदल संरक्षण सामग्री अद्ययावत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला काल मंजुरी दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेनं 21 हजार 772 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पाच भांडवली अधिग्रहण प्रस्तावांचा यात समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील काल नवी दिल्ली इथं परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये पाण्यावरुन अतिजलद मारा करणाऱ्या 31 विमानांच्या खरेदीसाठी मंजूरी, कमी-तीव्र...