January 8, 2025 10:54 AM January 8, 2025 10:54 AM
3
नोएडा इथे आजपासून फार्म-टू-फोर्क व्यापार प्रदर्शन सुरु
नोएडा इथल्या इंडिया एक्स्पोझिशन मार्टमध्ये आजपासून इंडसफूड 2025 हे 'शेतातून थेट ताटात' या संकल्पनेवर आधारित फार्म-टू-फोर्क हे व्यापार प्रदर्शन सुरु होत आहे. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इंडसफूड 2025 हे आशिया खंडातील सर्वात मोठं वार्षिक खाद्य-पेय व्यापार प्रदर्शन असून यात 30 पेक्षा जास्त देशातील 2300 हून अधिक प्रदर्शक एकत्र येत आहेत.