July 1, 2024 8:14 PM July 1, 2024 8:14 PM

views 25

तुर्कीये प्रांतात झालेल्या नैसर्गिक वायूच्या स्फोटामुळं ५ जण ठार, तर सुमारे ६० जण जखमी

तुर्कीये मधल्या इझमीर प्रांतात झालेल्या नैसर्गिक वायूच्या  स्फोटामुळं ५ जण ठार, तर सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. एका इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या या स्फोटामुळं परिसरातल्या ११ इमारतींना झळ बसली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरातला गॅस पुरवठा खंडित करण्यात आला असून तिथल्या रहिवाशांना इतरत्र हलवण्यात आलं आहे.