July 2, 2024 7:30 PM July 2, 2024 7:30 PM

views 17

नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता पूर्ण देश व्यापला असून येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील. विदर्भात पाऊस आणि वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामानवृत्तात म्हटलं आहे.

June 22, 2024 3:36 PM June 22, 2024 3:36 PM

views 10

राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला

राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला असून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.  खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. ठाणे शहरात काल रात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गावंडबाग भागात वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा फूटबॉल टर्फवर कोसळला. त्यात १५ ते १६ वयोगटातली सहा मुले जखमी झाली. त्यांना उपचारासाठी नजिकच...