June 21, 2024 7:36 PM June 21, 2024 7:36 PM
10
नंदूरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मौसमी पाऊस दाखल
उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार आणि धुळे जिल्ह्याचा काही भाग वगळता राज्यात सर्वत्र नैऋत्य मौसमी पावसाचं आगमन झालंय. गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. रत्नागिरीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सूर्या, वैतरणा, देहर्जा नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भा...