July 23, 2024 10:03 AM July 23, 2024 10:03 AM
10
भारताचे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांना “ऑलिंपिक ऑर्डर” हा बहुमान जाहीर
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारे पहिले भारतीय क्रीडापटू अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर हा बहुमान देऊन सन्मानित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळानं घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येत्या १० ऑगस्ट रोजी बिंद्रा यांना हा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे. बिंद्रा यांनी २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं.