November 6, 2024 11:02 AM November 6, 2024 11:02 AM

views 14

झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं तीस नेत्यांना पक्षातून केलं बडतर्फ

झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीनं तीस नेत्यांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोर म्हणून उभे राहिल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रमाकुमारी, कुकुमदेवी, जुलीदेवी, बलवंतसिंह, बांकेबिहारी यांच्यासह तीस जणांना बडतर्फ करण्यात आलं आहे. झारखंडमध्ये येत्या तेरा आणि वीस तारखेला मतदान होणार आहे.