November 6, 2024 2:05 PM November 6, 2024 2:05 PM

views 9

केंद्र सरकारतर्फे आजपासून साजरा करण्यात येतोय जल उत्सव

जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आजपासून पंधरा दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. नीती आयोगातर्फे या उपक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जल शक्ती मंत्रालयाच्या सहकार्यानं ही मोहिम राबवण्यात येत आहे. वीस राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाण्याचा वापर आणि पाणी व्यवस्...

July 6, 2024 7:03 PM July 6, 2024 7:03 PM

views 13

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आज अमरावती जिल्ह्यातल्या धऱणी तालुक्यात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आज अमरावती जिल्ह्यातल्या धऱणी तालुक्यात सुरुवात झाली. या अभियानात ज्या निकषांची पूर्तता करायची आहे त्यांची माहिती स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमात देण्यात आली. शिक्षण, आरोग्य, कृषी, पोषण आहार या क्षेत्रांमध्ये शंभर टक्के परीपूर्णता साधण्याचं आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं.  

July 4, 2024 5:04 PM July 4, 2024 5:04 PM

views 18

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, न...