July 6, 2024 11:11 AM

views 14

नीट पीजी आता 11 ऑगस्ट रोजी होणार

वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट पीजी आता 11 ऑगस्ट रोजी होणार असून ती 2 सत्रात घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेचं सुधारित वेळापत्रक काल जारी केलं. गेल्या महिन्यात परीक्षेच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

June 23, 2024 1:41 PM

views 19

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आज होणारी नीट-PG प्रवेश परीक्षा लांबणीवर

वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित, आज होणारी नीट-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर जाहीर केली जाईल. काही स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेबाबत झालेल्या आरोपांच्या अलीकडच्या घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. नीट-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचं सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.