June 18, 2024 7:41 PM June 18, 2024 7:41 PM

views 15

नीट २०२४ परीक्षेतल्या अनियमिततेच्या तक्रारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नीट २०२४ परीक्षेतल्या अनियमिततेच्या तक्रारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परीक्षेतल्या त्रुटींचं निवारण करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.  न्यायालयानं विद्यार्थ्यांबाबत चिंता व्यक्त करत राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार आहे.