July 10, 2024 7:53 PM July 10, 2024 7:53 PM

views 18

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीट ची परीक्षा योग्य – बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीटची परीक्षा योग्य असल्याचं बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. ते आकाशवाणीशी बोलत  होते. जे ई इ प्रवेश परीक्षेच्या धर्तीवर नीट ची परीक्षा अधिक काटेकोरपणे व्हावी आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा घडवून आणाव्यात,असंही मत  डॉ वेणुगोपाल यांनी व्यक्त केलं. 

July 1, 2024 8:15 PM July 1, 2024 8:15 PM

views 8

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनं लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या जलील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींना आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे, त्यामुळे त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.   

June 14, 2024 7:23 PM June 14, 2024 7:23 PM

views 29

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींच्या हिताला धक्का पोहोचणार नाही – धर्मेंद्र प्रधान

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीच्या हिताला धक्का पोहोचणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल, असं आश्वासन आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या समस्या समभावाने आणि सुयोग्य पद्धतीने सोडवू असं ते म्हणाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार केंद्र सरकार कार्यवाही करेल असंही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे. २४ लक्ष विद्यार्थ्यांच्या आशा सरकारनं धुळीला मिळवल्या...

June 13, 2024 9:13 PM June 13, 2024 9:13 PM

views 15

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले ग्रेस मार्क रद्द

नीट परीक्षेतल्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ग्रेस मार्कशिवाय मिळालेले गुण या विद्यार्थ्यांना कळवले जातील आणि त्यांना २३ जून रोजी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची नसेल त्यांचे ग्रेस मार्कांशिवाय मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील. २३ जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाईल, असंही सरकारनं आज सांगितलं. ग...