April 1, 2025 3:20 PM April 1, 2025 3:20 PM

views 29

राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलं व्यापक अभियान

राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यापक अभियान नुकतंच राबवलं. २५ दिवसांच्या या अभियानात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या २८ हजार प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या ४ हजार ७१९ बैठका झाल्या. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या बैठकांचे अहवाल मागवण्यात आले आहेत.

February 7, 2025 7:22 PM February 7, 2025 7:22 PM

views 13

राज्यातल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान वाढलेल्या मतदार संख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त वार्ताहर परिषदेत ही मागणी केली. निवडणूक आयोगानं दाद दिली नाही, तर आपल्याला न्यायालयाकडे जावं लागेल असं राहुल गांधी म्हणाले. राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार होते, असा आर...

February 4, 2025 2:50 PM February 4, 2025 2:50 PM

views 34

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निवडणूक आयोगाचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाची जाणूनबूजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर वारंवार केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्वाचं ठरत आहे. निवडणूक आयोग या आरोपांची दखल न घेता आपलं काम कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय निःपक्षपातीपणे करतच राहील असं आयोगाने समाजमाध्यमांवर म्हटलं आहे.

December 3, 2024 9:31 AM December 3, 2024 9:31 AM

views 18

ईव्हीएमबाबत खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीविषयीही त्यांनी खुलासा केला, ते म्हणाले. ‘‘आपण एक लक्षात ठेवा पाच ते सहाच्या नंतर सहाला कोणी क्यू मध्ये उभे होते त्यांना मतदान करायला अधिकार होते. म्हणून पूर्ण दिवसामध्ये कुठल्याही स्तरावर किती टक्केव...