September 6, 2025 1:42 PM September 6, 2025 1:42 PM
13
भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती
भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो, योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल, असं त्या काल एका मुलाखतीत म्हणाल्या. भारताच्या आयातीत कच्च्या तेलाचं प्रमाण अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. नवीन जीएसटी प्रणालीमुळे वस्तूंचा खप वाढेल मात्र त्यामुळे भांडवली खर्चावर काहीही परिणाम होणार नाही...