July 24, 2024 2:41 PM

views 33

कर्करोगावरील औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

कर्करोगावरची औषधं सहजरित्या उपलब्ध व्हावीत, यासाठी या औषधांच्या आयात शुल्कात सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. यात स्तनांच्या कर्करोगासाठी, फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी आणि पित्तनलिकेच्या कर्करोगासाठी असलेल्या औषधांचा समावेश आहे. देशातल्या २७ लाख कर्करुग्णांना याचा लाभ मिळणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. 

July 23, 2024 8:14 PM

views 33

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार बियाणांच्या वाणाची निर्मिती करण्यासाठी सर्वसमावेशक कृषी संशोधन यंत्रणेचा पुनर्परीक्षण करण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडतानाच्या भाषणात सांगितलं.  सरकार आणि तज्ञ यावर देखरेख करणार आहेत. तेलबिया, कडधान्यं या बाबतीत...

July 22, 2024 7:15 PM

views 31

२०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज

२०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष २०२४-२५ वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडे सहा ते सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना  आर्थिक वर्ष २०२३-२४ ​​मध्ये देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे.  रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष २०२५ साठी चलनफुगवट...