February 6, 2025 10:36 AM February 6, 2025 10:36 AM

views 24

संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं निधन

वारकरी संप्रदायातील वैचारिक नेतृत्व आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचं काल आकस्मिक निधन झालं. ते 30 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.  

February 5, 2025 3:39 PM February 5, 2025 3:39 PM

views 8

इस्मायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आगा खान चौथे यांचं पोर्तुगालमध्ये निधन

इस्मायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आगा खान चौथे यांचं पोर्तुगालमध्ये ८८व्या वर्षी निधन झालं. आगाखान यांचा दफनविधी लिस्बन इथे होणार आहे. ते वयाच्या विसाव्या वर्षी इमाम बनले. त्यांनी आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कचं नेतृत्व केलं होतं. जवळपास ३० देशांमध्ये या संस्थेने आरोग्य, शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे.

February 5, 2025 2:02 PM February 5, 2025 2:02 PM

views 15

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं निधन

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तमिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी पहिल्यांदा दिली होती. ही बातमी रेडिओ सिलोनवरून पहाटे पावणे सहा वाजता प्रसारित झाली होती. वेंकटरमण यांनी आकाशवाणीसाठी नियमित आणि प्रासंगिक कलाकार म्हणून ६४ वर्षे काम केलं.

January 22, 2025 8:42 AM January 22, 2025 8:42 AM

views 6

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्यावर काल आळंदी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं सोमवारी रात्री पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झालं. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक प्रबोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचं सामाजिक कार्य किसन महाराज साखरे यांनी केलं. संस्कृत आणि मराठीतून एकंदर 115 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम...

January 15, 2025 11:13 AM January 15, 2025 11:13 AM

views 15

संगीत रंगभूमीचे अभ्यासक, गायक, संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचं निधन

संगीत रंगभूमीचे अभ्यासक, गायक, संगीतकार अरविंद पिळगांवकर यांचं नुकतंच मुंबईत अल्पशा आजाराने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या. तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या कार्यक्रमांसाठी देखील काम केलं.

December 7, 2024 10:16 AM December 7, 2024 10:16 AM

views 3

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर आज राजूरमध्ये अंत्यसंस्कार

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेल्या 15 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज राजूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. मधुकर पिचड अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभा मतदार संघातून 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षातून केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ...

December 5, 2024 9:25 AM December 5, 2024 9:25 AM

views 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. युनायटेड स्टेट्स माहिती सेवेतून त्यांनी मुंबईत अमेरिकी दूतावासात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बीडच्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पाटोदेकर यांनी काम केलं, १९८१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदी त्यांची निवड झाली होती. पाटोदेकर यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

December 4, 2024 9:20 AM December 4, 2024 9:20 AM

views 16

तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक संचालक बंकटराव कदम यांचं निधन

तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक संचालक बंकटराव कदम यांचं काल जळकोट इथं निधन झालं. कदम यांनी कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे संस्थापक संचालक, जळकोटचे माजी सरपंच, पार्वती कन्या प्रशालेचे अध्यक्ष, महाराष्ट्र वाचनालयाचे अध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.  

November 10, 2024 5:03 PM November 10, 2024 5:03 PM

views 9

ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत शुक्रवारी रात्री त्यांच वांद्रे इथल्या त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. सारंगीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात एकल वाद्य म्हणून नावारुपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वयाच्या १० व्या वर्षापासून सारंगीची तालीम घेणाऱ्या रामनारायण यांनी ऑल इंडिया रेडिओच्या लाहोर केंद्रावर सारंगीवादक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला.   शास्त्रीय संगीताबरोबरच चित...

November 6, 2024 2:08 PM November 6, 2024 2:08 PM

views 11

ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन

ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. बिहारमधल्या लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात उद्या पाटणा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. नवी दिल्लीतल्या एम्समध्ये काल रात्री त्यांचं निधन झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शारदा सिन्हा यांची मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.श...