January 22, 2025 3:39 PM January 22, 2025 3:39 PM
17
नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवस्थान पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनं यासाठी नियोजन केलं आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं दिंड्या येत आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी उद्यापासून ते २७ जानेवारी दरम्यान होणार आहे. यानिमित्तानं राज्यातले मान्यवर कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देणार आहेत.