August 19, 2024 7:21 PM August 19, 2024 7:21 PM
3
राज्यात नारळी पौर्णिमा उत्साहानं साजरी
राज्यात आज नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करुन आणि नारळ अर्पण करुन होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने किनापट्टीवरच्या कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबईतल्या जुहू, वेसावे, खारदांडा, मढ, मालवणी, गोराई, माहुल, वरळी आदी कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळीवाडे सजले असून द...