August 1, 2024 1:37 PM

views 11

देशभरातल्या १५ विमानतळांवर डिजियात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार

देशभरातल्या १५ विमानतळांवर डिजियात्रा हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन यांनी दिली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. डिजियात्रा उपक्रमामुळे प्रवाशांचा विमानतळावरचा वावर सुलभ होतो, असं त्यांनी सांगितलं. हा उपक्रम लवकरच आणखी १२ विमानतळांवर सुरू होणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.