June 13, 2024 7:27 PM June 13, 2024 7:27 PM

views 15

नागपुरात स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू, ३ जखमी

नागपुरात धामणी परिसरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. चामुंडा एक्स्प्लोझिव्ह कंपनीत दुपारी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि स्थानिक बचाव पथक याठिकाणी मदत कार्य करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.