February 4, 2025 4:06 PM

views 25

नागपूर : जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती रैल्लीच आयोजन

आज जागतिक कर्करोग विरोधी दिन आहे. युनायटेड बाय युनिक अशी या दिनाची संकलंपना असून कर्करोगाला प्रतिबंध, त्याचं निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. जागतिक कर्करोग दिनानिमित्त नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्यावतीनं आज जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विविध घोषवाक्य तसंच पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या फेरीत विविध आरोग्य महाविद्यालयातले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.  

January 22, 2025 9:54 AM

views 27

नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट

दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या संशोधनाचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत.. ‘‘वाहन चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचं कुठे, हा दुचाकी चालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र येत्या काही दिवसांत हे हेल्मेट दुचाकीच्या डिक्कीमध्ये फोल्ड करून...

January 7, 2025 2:43 PM

views 41

नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणू संदर्भात सद्यस्थितीत काळजीचे कोणतेही कारण नाही – डॉ . विपीन इटनकर

नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकाऱयां सांगितलं. महाराष्ट्रात नागपूरमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा केवळ संशय असल्याचं नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी आज प्रसार माध्यमांना सांगितलं. संशयित नमुने आयसीएमआर एनआयव्ही कडे पाठवले असून, त्याचा अहवाल आल्यावर योग्य उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नागपूरमध्ये दोन लहान मुलांमध्ये एचएमपीव्ही संसर्गाची लक्षणं आढळून आल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं, त्या पार्श्व...

December 5, 2024 10:05 AM

views 18

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्याला जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्यात काल सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 पूर्णांक 3 रिख्टर होती आणि तेलंगण राज्यातील मुलुगु इथं या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं जाहीर केलं आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळं कोणतीही जिवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

August 19, 2024 8:20 PM

views 22

नागपूरचं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात सामंजस्य करार

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.   या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा दिली जाईल. तसंच तिथल्या रुग्णालयांतील आरोग्य कर्मचारी, नर्सेस ना  प्रशिक्षणाची जबाबदारी या इन्स्टिट्युटला दिली आहे. या करारामुळे मह...

August 19, 2024 6:30 PM

views 29

नागपूरच्या सुप्रिया मसराम आणि शिवांश मसरामची इंडिया आणि आशिया रेकॉर्डस बुकमध्ये नोंद

नागपूरच्या सुप्रिया कुमार मसराम यांनी संविधानातली ७५ कलमं तोंडपाठ म्हणून दाखवण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी त्यांनी दहा मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता, पण त्यांनी अवघ्या ६ मिनिटं २१ सेकंदांत, उपस्थितांपुढे भराभर कलमं सांगून विक्रम केला. तर त्यांचा ११ वर्षांचा मुलगा शिवांशनं विज्ञानाच्या पुस्तकातल्या शंभर पानांवर अधोरेखित असलेले शब्द न पाहता उपस्थितांना अवघ्या ८ मिनिटं पाच सेकंदांत अचूक सांगितले.   एकाचवेळी निर्धारित वेळेच्या आधी आपापलं उद्दिष्ट गाठत या मायलेकांनी इंडिया आणि आशिया रेकॉर्डस...

August 11, 2024 8:48 PM

views 26

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात भाजपाच्या मध्य नागपूर कार्यकारीणीच्या बैठकीत बोलत होते. कार्यकर्ता जाती-धर्म-पंथानं मोठा होत नाही, तो कार्य आणि कर्तृत्वानं मोठा होतो. त्यामुळे जातीवादाचे समर्थन न करता आचरण चांगले ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कार्यकर्त्याच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक सुख-दुःखाशी नेत्यांनी समरस व्हावं. आपला नेता आपल्यासोबत उभा राहील असा...

July 28, 2024 7:40 PM

views 29

प्रशासनाने स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने रस्ते सुरक्षा संदर्भात जागृती करावी – मंत्री नितीन गडकरी

नागपूर जिल्ह्यातल्या अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासन, वाहतूक तसंच रस्ते बांधणी यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखणं आणि लोकसहभाग वाढवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. गडकरी हे आज नागपूर जिल्हा सुरक्षा समिती बैठकीत सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अपघात प्रवण ठिकाणी सुधारणा घडवून आणण्यासाठी सेव लाईफ फाउंडेशन तसंच इतर स्वयंसेवी संस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत अशी सूचनाही त्या...

July 11, 2024 12:17 PM

views 21

नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

निविदा आणि खरेदी प्रक्रियेतल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे निरीच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार आणि दिल्लीत 17 ठिकाणी काल छापेही घालण्यात आले. निरीतील पाच सरकारी अधिकारी, तसंच नवी मुंबई, ठाणे, प्रभादेवी इथल्या तीन खासगी संस्थांमधल्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली. सर्वसाधारण आर्थिक नियम डावलून या संस...

July 1, 2024 7:28 PM

views 21

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला तत्काळ स्थगिती

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगविरोधात आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर या बांधकामाला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दीक्षाभूमी सुधार आराखड्यावर काही आक्षेप असतील तर त्यावर सर्वांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं फडणवीस म्हणाले. दीक्षाभूमीच्या मुख्य स्तुपाला या पार्किंगमुळे धोका निर्माण होईल, असा आंदोलकांचा आक्षेप आहे. दीक्षाभूमीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि संघटनांमध्ये या आक्षेपांबाबत चर्चा...