September 6, 2025 10:32 AM

views 34

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्याच्या २९ जिल्ह्यांमधल्या १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झालं आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख २० हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं असून, धाराशिव जिल्ह्यात एक लाख ५० हजार ७५३ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.

April 15, 2025 11:06 AM

views 16

नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आज अवकाळी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वात जास्त ४२ पूर्णांक ४ अंश सेल्सिअल तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ३९ पूर्णांक सहा, तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  

April 9, 2025 9:55 AM

views 29

नांदेड – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं फरोग मुकदम यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन काल जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा फरोग मुकदम यांच्या हस्ते झालं. येत्या १४ तारखेपर्यंत चालणार्या या सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचं काम सर्वांनी प्राधान्यानं करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

February 7, 2025 11:13 AM

views 29

नांदेड – भोकर शहरात राबवण्यात येणार हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर शहरात दहा ते २३ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने काल भोकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात झालेल्या डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी कर्मचार्यांच्या प्रशिक्षण सत्रात वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं. या मोहिमेअंतर्गत डी.ई.सी आणि अल्बेडाँझॉल गोळया देण्यात येणार आहे.

February 6, 2025 3:43 PM

views 138

नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी स्वीकारला पदभार

नांदेड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या राहुल कर्डिले यांनी आज आपला पदभार स्वीकारला. यापूर्वी ते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक होते. मावळते जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे आता छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून आपला पदभार स्वीकारणार आहेत.  

January 16, 2025 9:34 AM

views 14

एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं नांदेड येथे उद्घाटन

एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्याच्या संघानी आपापल्या राज्याच्या झेंडा फडकवत संचलन केलं, त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहण तसंच दीप प्रज्वजलन करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

January 7, 2025 8:53 AM

views 23

लातूर येथे सुरू असलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप

लातूर इथं सुरू असलेल्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. या चार दिवसीय स्पर्धांमध्ये हॉकी तसंच जलतरण आदी स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.

December 12, 2024 10:45 AM

views 38

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर येथे दत्तशिखर गडावर आजपासून दत्त जयंती उत्सव सोहळ्याला होतोय प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तशिखर गडावर आजपासून दत्त जयंती उत्सव सोहळ्याला प्रारंभ होत आहे. आज पहिली पालखी निघणार असून, १४ डिसेंबर रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. १७ डिसेंबरला काकड आरतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यानिमित्त एसटीच्या माहूर आगारातून अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. ठिकठिकाणी आरोग्य पथकं तसंच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

December 4, 2024 9:23 AM

views 36

आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवटचा राज्यात चौथा क्रमांक

नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्याने राज्यातून चौथा तर संपूर्ण देशातून ५१ वा क्रमांक पटकावला आहे. “संपूर्णत: अभियानात सहा सूचकांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन काम करण्यात आलं. यात प्रामुख्याने प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी ही ९४ टक्क्यांवरुन ९७ टक्के, मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची, तसंच उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही ८५ वरुन १०० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पूरक पोषण आहार घेणार्...

November 11, 2024 9:49 AM

views 49

नांदेड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, मुद्देमालासह अवैध दारु जप्त

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा उत्पादन शुल्क विभागानं गेल्या तीन दिवसात धडक कारवाया करुन आठ लाख १७ हजार ३० रुपयांच्या मुद्देमालासह अवैध दारु जप्त केली. जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया मुक्त आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत.