September 23, 2024 7:35 PM September 23, 2024 7:35 PM

views 6

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश

MPSC च्या राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत राज्यशासनाच्या कृषि सेवेतल्या पदांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज नवी मुंबईत बेलापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ ची जाहिरात गेल्या डिसेंबरमधे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर कृषी विभागतल्या २५८ पदांसाठीची मागणी आयोगाला मिळाली. शासनाच्या विनंतीनुसार या पदांचा समावेश  त्याच परीक्षेत करण्यात आला असून आता ...

August 14, 2024 5:06 PM August 14, 2024 5:06 PM

views 11

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन

नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्प लाईनचं आणि व्हॉट्स अप चॅनेलचं उद्घाटन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज केलं. व्हॉट्सअप चॅनेलद्वारे सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षे संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. हेल्पलाईन आणि व्हॉट्स अप चॅनेलला मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून हा उपक्रम राज्यभरात लागू करणार असल्याचं शुक्ला यांनी सांगितलं.

July 28, 2024 3:36 PM July 28, 2024 3:36 PM

views 14

नवी मुंबई आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा कोपरखैरणे ते वाशी लॉंग मार्च

नवी मुंबईतल्या शिळफाटा इथल्या मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणी आज नागरिकांनी नवी मुंबईत मोर्चा काढला. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.   दरम्यान, यातल्या दोषींवर आरोपपत्र दाखल करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तसंच गृह विभागाच्या मुख...

July 28, 2024 3:46 PM July 28, 2024 3:46 PM

views 16

नवी मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणी दोन आरोपींना अटक

नवी मुंबईच्या वाशी सेक्टर ९ मधल्या हिट अँड रन प्रकरणात दोन आरोपींना काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी एका कारनं दिलेल्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली.

July 1, 2024 6:51 PM July 1, 2024 6:51 PM

views 2

देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु

देशभरात आजपासून लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. या तीन कायद्यांबद्दल पोलीस विभाग नवी मुंबईत जनजागृती करत आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित पोलीसांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळांनी सुसज्ज असलेल्या दोन गाड्याही सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचं भारंबे या पत्रकार परिषदेत म्हणाले.