October 3, 2024 2:56 PM October 3, 2024 2:56 PM
8
देशभरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
राज्यात आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाला उत्साहाने प्रारंभ झाला. आजपासून पुढचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला. याशिवाय राज्यात इतरत्रही देवी मंदिरांमधे उत्सव सुरु झाला. मुंबईतही मुंबादेवी आणि महालक्ष्मी यांच्या मंदिरांमध्ये या उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी घटस्थापना करुन भाविक देवीचं पूजन करीत आहेत. रत्नागिर...