September 24, 2024 7:02 PM September 24, 2024 7:02 PM

views 23

गडचिरोलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेजवळ छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचा समावेश आहे. तो मागच्या वीस वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. हत्या, जाळपोळ करणं असे ६६ गुन्हे त्याच्यावर दाखल होते. लोकसभा निवडणुकीवेळी भामरागड तालुक्यातल्या कोठी इथल्या मतदान केंद्रावर हल्ला करण्यात रुपेश मडावी याचा सहभाग होता असं पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं.

June 27, 2024 6:56 PM June 27, 2024 6:56 PM

views 10

दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या दोघींवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२२ पासून आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावं आणि  स्वाभिमानाचं  जीवन जगावं , असं  आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केलं  आहे.

June 21, 2024 8:17 PM June 21, 2024 8:17 PM

views 22

जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेमचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण

२ हजार १३ सालापासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या, सालेकसा तालुक्यातल्या पोलिसांच्या चकमकीत सहभाग असलेल्या जहाल नक्षलवाद्यानं, गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम असं आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचं नाव असून तो मूळचा छत्तीसगढचा आहे. शासनानं त्याच्यावर ७ लाखाचं  बक्षिस जाहीर केलं होतं. या माओवाद्यानं जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष, नक्षल आत्मसमर्पण योजनेअंतर्गत  आत्मसमर्पण केलं  आहे.