July 27, 2024 6:21 PM July 27, 2024 6:21 PM

views 11

८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

आठ लाखांचं बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलीनं आज गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं. तिच्यावर चकमक आणि हत्या असे दोन गुन्हे दाखल आहेत. रिना नरोटे असं तिचं नाव असून ती भामरागड तालुक्यातल्या बोटनफुंडी इथली रहिवासी आहे. २००६ मध्ये ती नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमची सदस्य झाली होती.  आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६७१ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचं पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी सांगितलं.